स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा




केज, आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी आदर्श ग्रामपंचायत कोल्हेवाडी गावामध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.




स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम ग्रामपंचायत कोल्हेवाडी येथील ध्वजारोहण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिसाळ वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डांगे वस्ती, तसेच शहीद जवान उमेश मिसाळ स्मारक इत्यादी, ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. आकाशात फडकणार्‍या ध्वजाकडे पाहत राष्ट्रगीत व देशभक्तीपर आणि समूहगीत मुलांनी सादर केली.



उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीरांना पुष्पांजली अर्पण करून मार्गदर्शनपर भाषणात स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाच्या गोष्टी  मुलांना व ग्रामस्थांना सांगितल्या. कठीण प्रयत्नाने मिळालेले स्वातंत्र्य टिकविणे तुमच्याच हाती असल्याचे ते शेवटी विद्यार्थ्यांना म्हणाले.





यानंतर एक प्रभात फेरी काढण्यात आली घरोघरी तिरंगा तुमच्या घरी आमच्या घरी सगळीकडे तिरंगा तिरंगा असे फलक हाती धरून स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत मुले व ग्रामस्थ चालत होते.
शेवटी सर्वांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.




कार्यक्रमाला उपस्थित सरपंच प्रेमाला नंदूलाल मिसाळ, उपसरपंच श्रीराम खांडेकर, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव मिसाळ,कृष्णा आगाव, सुरेश आगाव, ग्रामविकास अधिकारी आगाशे साहेब, जी.प. मुख्याध्यापक शिंदे सर व डोईफोडे सर. गावातील प्रतिष्ठित नागरिक बाबासाहेब मिसाळ, रामराव, चंदू मिसाळ, राजाभाऊ खांडेकर, अशोक खांडेकर,बालाजी मिसाळ,सुरेश आघाव, भाऊराव आंधळे, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Comments

Popular posts from this blog

तहसील कार्यालया समोर अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा उभे करण्या वरून रिक्षा चालकांची दादागिरी,भेळच्या गाड्यावर दगडफेक करत छोट्या व्यवसायिकास धक्काबुक्की करत रोड टॅक्स भरत असल्याची रिक्षा चालकांची धमकी

आंबेजोगाई येथील उप विभागीय कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांचे दोन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन चालू.

माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक माजी आमदारासह गाडीचा चालक जखमी