तहसील कार्यालया समोर अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा उभे करण्या वरून रिक्षा चालकांची दादागिरी,भेळच्या गाड्यावर दगडफेक करत छोट्या व्यवसायिकास धक्काबुक्की करत रोड टॅक्स भरत असल्याची रिक्षा चालकांची धमकी

 

तहसील कार्यालया समोर अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा उभे करण्या वरून रिक्षा चालकांची दादागिरी,भेळच्या गाड्यावर दगडफेक करत छोट्या व्यवसायिकास धक्काबुक्की करत रोड टॅक्स भरत असल्याची रिक्षा चालकांची धमकी

केज/प्रतिनिधी


तहसील कार्यालया समोर अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा उभे करण्या वरून रिक्षा चालकाने दादागिरी केली आहे तसेच भेळच्या गाड्यावर दगडफेक करत छोट्या व्यावसायिकास धक्का बुक्की करत रोड टॅक्स भरत असल्याची रिक्षा चालकांनी धमकी दिली आहे.तसेच एका रिक्षा चालकाने त्याचा रिक्षा मेन रोडवर भर दिवसा आडवा उभा करून भेळचा व्यवसाय करणाऱ्यासोबत रिक्षा चालकांची भांडण झाल्याची घटना घडली आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की,तहसील कार्यालयाच्या समोरअवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा हे रस्त्यावर व कार्यालयाच्या समोर लावले जात आहेत सदर रिक्षामुळे तहसील कार्यालयात कामास येणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते तहसील कार्यालयासमोर सर्रासपणे रिक्षे उभे केल्या मुळे रस्त्याच्या बाजूने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच तहसील कार्यालया च्या समोर अनेक नागरिक व अनेक संघटनेचे आणि पक्षाचे उपोषण असतात या ठिकाणी रिक्षे उभे असल्यामुळे त्या ठिकाणी उपोषणकर्त्यांना देखील बसता येत नाही त्यांना कोणी रिक्षा काढा म्हणले तर ते अर्वाच्य भाषा करत अरेरावी करत आहेत. अनेक नागरिकांना या रिक्षा चालकांचा सामना करावा लागत आहे व त्यांचा त्रास नाहक नागरिकांना सहन करावा लागत आहे याकडेपोलीस प्रशासन व तहसीलदार लक्ष देतील का व त्यांच्या वर कारवाई केली जाईल का असे नागरिकांतून बोलले जात आहे.दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारच्या सुमारास वैष्णवी भेळच्या गाड्या समोर रिक्षा उभा केल्यामुळे सदर भेळच्या गाड्याकडे ग्राहकांना येण्यास रस्ता नसल्यामुळे भेळ व्यावसायिकांनी सदर रिक्षा चालकास रिक्षा काढण्यास सांगितल्याच्या रागावरून रिक्षा चालक व भेळ व्यावसायिकयांच्यात शाब्दिक बाचाबाची चालू झाली परंतु सर्व रिक्षा चालक एकत्र येत भेळ व्यवसाय करणाऱ्याला शिवीगाळ करत त्यांच्या गाड्यावर दगडफेक करत शिवीगाळ करीत आम्ही रोड टॅक्स भरत आहोत असे म्हणत धमकी देत होते तर एका रिक्षा चालकांने चक्क मेन रोड वर आडवा रिक्षा उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. या ठिकाणी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती व काही नागरिकांनी रिक्षा चालक आणि भेळ व्यवसाय करणाऱ्या यांच्यात मध्यस्थी करून त्यांची भांडणे मिटवली आहेत.



तहसीलकार्यालयाच्या समोर अनेक छोटे व्यावसायिक हेअतिक्रमण करून व्यवसाय करत आहेत तर रस्त्यावरच शिवाजी चौकापासून ते तहसील कार्यालयाच्या गेट पर्यंत अनेक अवैध वाहतूक करणारे रिक्षा उभे असतात त्यामुळे वाहन चालकांना व रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना व तहसील मध्ये काम करण्यास येणाऱ्या नागरिकास तारे वरची कसरत करावी लागत आहे परंतु रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत असताना देखील सदर रिक्षाचालक हे रिक्षा काढत नाहीतअसे या ठिकाणी जमलेल्या नागरिकांतून बोलले जात होते.सदर प्रकरणी तहसीलदार व पोलीस प्रशासन काय कारवाई करेल का अशी देखील या उपस्थित नागरिकांतून चर्चा ऐकण्यास मिळत होती.

Comments

Popular posts from this blog

आंबेजोगाई येथील उप विभागीय कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांचे दोन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन चालू.

माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक माजी आमदारासह गाडीचा चालक जखमी