बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

 

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न 


* स्त्री सशक्तीकरणासाठी जनजागृती शिबिर अतिशय महत्वाचे-आरती जाधव

* आत्मविश्वास आणि ठामपणा या बाजू मजबूत ठेवून महिलांनी अन्यायावर आवाज उठवावा- सीताताई बनसोड




* कलंब 


दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी बंसल क्लासेस कळंब शाखेच्या माध्यमातून महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण या विषयवार कळंब शाखेत शिबिर आयोजित करण्यात आले. या प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून पोलीस उप-निरीक्षक तथा पिंक पथकाच्या प्रमुख उपविभाग कळंब आरती जाधव मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून केज  नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड मॅडम या देखील उपस्थित राहिल्या. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजीवनी जाधवर मॅडम बी. डी.एस.आणि मोडेल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रा.लता यंदे मॅडम या देखील आवर्जून उपस्थित राहिल्या.

स्त्री सशक्तीकरण व महिलांच्या सुरक्षेचा विषय लक्षात घेता बंसल क्लासेस कळंब व केज शाखेचे संचालक यासीन हारूणभाई इनामदार यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.




सदर कार्यक्रमात आरती जाधव मॅडम यांनी स्वसंरक्षण, सायबर सुरक्षा, ऑनलाइन सुरक्षा, कायदेशीर अधिकार व समर्थन, चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श या विषयांवर प्रकाश टाकत उपस्थित महिला व मुलींना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित पालक महिला व विद्यार्थिनींच्या प्रश्नांना उत्तर देत पोलीस विभागातर्फे कशी मदत मिळू शकते यावरही उत्तमरीत्या मार्गदर्शन केले.

आत्मविश्वास आणि ठामपणा या बाजू मजबूत ठेवून महिलांनी अन्यायावर आवाज उठवावा- सीताताई बनसोड

कार्यक्रमाच्या अध्यक्षा लाभलेल्या केज  नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांनी देखील अन्यायावर आवाज उठविण्याचे महिलांना आवाहन केले. महिला आणि मुलींनी आपल्याबरोबर कुठे गैरवर्तन होत असेल,अनुचित प्रकार घडत असेल तर अशावेळी न घाबरता, न डगमगता आपला आवाज उठवावा असे आवाहन केले. महिला सशक्तीकरण आणि जनजागृतीसारखे उपक्रम किती महत्त्वाचे आहेत यावर त्यांनी विश्लेषण करत असताना कायदा आणि महिलांचे अधिकार यावर प्रकाश टाकला.

महिलांच्या मानसिक व सामाजिक दिशा सुरक्षित व स्वतंत्र असल्या पाहिजेत डॉ. संजीवनी जाधवर

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या डॉ. संजीवनी जाधवर यांनी महिलांचे सामाजिक व मानसिक सशक्तीकरण किती गरजेचे आहे यावर भाष्य केले. पालक महिलांनी आपल्या पाल्यांना मनमोकळेपणाने त्यांच्या अडचणींवर बोलावे, त्यांच्या पाल्यांच्या आरोग्यावर जातीने लक्ष द्यावे आणि पाल्यांच्या  दैनंदिन दिनचर्या व घडामोडींवर लक्ष देत मार्गदर्शन करावे असे त्यांनी आपल्या भाषणात विशेष मुद्दे नमूद केले. लिंग समानता हा विषय किती महत्वाचा आहे यावर देखील त्यांनी भाष्य केले.


( होम लोन, बिजनेस लोन, पर्सनल लोन, कार लोन, यूजकार लोन, एजुकेशन लोन, डॉक्टर लोन ,गोल्ड लोन, क्रेडिट लोन,9767266200 )


स्त्री जीवनात शिस्त आणि आत्मविश्वास खूप महत्त्वाचा प्रा. लता यंदे स्त्री जीवनात शिस्त आणि आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे आणि तो प्रत्येक स्त्रीने अंगिकारला पाहिजे असे प्रा.लता यंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले. स्त्रीने समाजात वावरताना एक शिस्त जपली पाहिजे आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपल्यावर होत असलेल्या अन्यायावर आवाज उठवला पाहिजे असे त्यांनी यावेळी  नमूद केले. आपल्या बाबतीत जर कुठेही अनुचित प्रकार घडत असेल,तर प्रत्येक महिलेने व मुलीने त्यावर ताबडतोब आवाज उठवावा. समाजात स्त्रियांविषयी घडत असलेल्या अनुचित प्रकाराचा निषेध दर्शवत यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थी मुलींनी विशेषतः स्वतःची काळजी कशी घ्यावी यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.

संबधित कार्यक्रमावेळी बंसल क्लासेस कळंब शाखेच्या प्रा.अभिलाषा उन्हाळे मॅडम,  प्रा.श्रद्धा जाधव मॅडम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत बंसल क्लासेस कळंब शाखा मुलींच्या सुरक्षेसाठी कशा पद्धतीने सजग आणि सज्ज आहे यावर प्रकाश टाकला. बंसल क्लासेस विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि त्या संबंधित नियमांचे पालन करताना कायदा,तांत्रिक, वैयक्तिक लक्ष आणि मनुष्यबळ इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रित करत असल्याची ग्वाही यावेळी संबंधित महिला प्राध्यापकांनी दिली. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.शामल गुंड यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्रा.आकांक्षा चौरे मॅडम यांनी केले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखेचे सह-संचालक इंजि.गोविंद ठोंबरे,व्यवस्थापक प्रा.सचिन बडे, शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा. अतुल थोरात तसेच शाखेचे कर्मचारी सुमित शिनगारे,अश्विनी वाघमारे, पल्लवी शेळके, अविनाश पारवे,संदेश भांडवलकर,सचिन पंडीत यांनी अथक परिश्रम घेतले.



Comments

Popular posts from this blog

तहसील कार्यालया समोर अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा उभे करण्या वरून रिक्षा चालकांची दादागिरी,भेळच्या गाड्यावर दगडफेक करत छोट्या व्यवसायिकास धक्काबुक्की करत रोड टॅक्स भरत असल्याची रिक्षा चालकांची धमकी

आंबेजोगाई येथील उप विभागीय कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांचे दोन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन चालू.

माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक माजी आमदारासह गाडीचा चालक जखमी