बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांचा केज तालुक्यात झंझावात जिवाचीवाडी येथे स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नाम फलक कमानीचे उद्घाटन संपन्न

 

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांचा केज तालुक्यात झंझावात जिवाचीवाडी येथे स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नाम फलक कमानीचे उद्घाटन संपन्न



कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे  यांचा केज तालुक्यात झंझावात दौरा जागोजाजागोजागी  मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. परंतु सत्कारात फुलहार गुच्छ न घेता सर्वांच्या भेटी घेऊन जीवाचीवाडी,तूकूचीवाडी येथील जनतेशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी खुशखबर दिली की, मागील विज बिल भरायचे नाही येथून पुढे द्यायचे नाही,





 शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच ५००० रुपये अनुदान जमा करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आश्वासित केले व यापुढेही आम्ही बहिण भाऊ दोघेही आपल्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव आपल्या सेवेत राहू आणि आपले असलेले ऋण आमच्या कातडीचे जोडे करून जरी तुम्हाला घातले तरी हे ऋण आम्ही फेडु शकत नाही असे यावेळी धनंजय मुंडे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. 






तसेच परळी येथे पाच दिवसाचे कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे तरी आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सर्व शेतकरी बांधवांना करतो असे पालकमंत्री धनंजय मुंडे  यांनी बोलताना स्पष्ट केले.




तसेच यावेळी तुकोचीवाडी येथील महीलांनी पालकमंत्री धनजंय मुंडे यांचे औक्षण करून राख्या बांधल्या आहेत. 
यावेळी माजी आमदार केशव दादा आंधळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत बापू मुंडे, विजयकांत भैय्या मुंडे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे, नंदू दादा मोराळे ,सांगवी सा. चे सरपंच संजय केदार, सारंग आंधळे, बालाजी तांदळे, नागझरी चे सरपंच चंद्रसेन चौरे, तसेच परिसरातील आजी माजी सरपंच व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आंबेजोगाई येथील उप विभागीय कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांचे दोन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन चालू.

तहसील कार्यालया समोर अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा उभे करण्या वरून रिक्षा चालकांची दादागिरी,भेळच्या गाड्यावर दगडफेक करत छोट्या व्यवसायिकास धक्काबुक्की करत रोड टॅक्स भरत असल्याची रिक्षा चालकांची धमकी

माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक माजी आमदारासह गाडीचा चालक जखमी