ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

 ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई 





केज,

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई करण्यात आली असून सदर कारवाईमध्ये १लाख ५० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करूनहॉटेल मालक व मॅनेजरयांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी एका गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की,केज-बीड या राष्ट्रीय महामार्गावरील मस्साजोग येथील अभिषेक बिअरबार येथे दि.१५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशाने ड्रायडे असताना देखील सदरचे बियरबार उघडे ठेवून दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने दुपारी ३-०० वाजण्याच्या सुमारासकेज पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊनशहानिशा केली असता त्या ठिकाणी दारू विक्री केली जात असल्याचे निष्पन्न झाल्या वरून सदर पथकाने छापा टाकून दोन पंचा समक्ष पंचनामा करून विदेशी दारूच्यारम,व्हिस्की,बियर,व्होडका इत्यादी असा अंदाजे एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.हॉटेल अभिषेकचे मॅनेजर अंकुश दयाराम पाटील रा.मस्साजोग आणि मालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू आहे.सदर कारवाईपोलीस अधीक्षक अविनाश बारगळ बीड,अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम आंबेजोगाई, सहाय्यकपोलीसअधीक्षक कमलेश मीना उप विभागीय अधिकारी केज, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस ठाणे केज यांच्या मार्गदर्शना खाली पोलीसउपनिरीक्षक राजेश पाटील,पोलीस हवालदार श्रीकांत चौधरी, पोलीस हवालदार बाळासाहेब अहंकारे, चालक पोलीस हवालदार शंभूदेव दराडे,पोलीस काँन्स्टेबल प्रकाश मुंडे, गोपीनीय शाखेचे पोलीस काँन्स्टेबल मतीन शेख यांनी सदर कारवाई केली आहे.

 


Comments

Popular posts from this blog

तहसील कार्यालया समोर अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा उभे करण्या वरून रिक्षा चालकांची दादागिरी,भेळच्या गाड्यावर दगडफेक करत छोट्या व्यवसायिकास धक्काबुक्की करत रोड टॅक्स भरत असल्याची रिक्षा चालकांची धमकी

आंबेजोगाई येथील उप विभागीय कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांचे दोन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन चालू.

माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक माजी आमदारासह गाडीचा चालक जखमी