जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत ऑगस्ट क्रांतीदिन साजरा
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत ऑगस्ट क्रांतीदिन साजरा
केज/प्रतिनिधी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी ता.केज या शाळेत दिनांक ९ ऑगस्ट रोजी म.गांधी व क्रांतिकारकांच्या प्रतिमेस राजाभाऊ कदम व भारत हांगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दि.८ ऑगस्ट १९४२ रोजी कॉंग्रेसच्या मुंबई अधिवेशनात म.गांधींनी "भारत छोडो"आंदोलन सुरू केले.म.गांधीजींनी त्यांच्या भाषणात भारतीय जनतेला "करो या मरो"चे आवाहन केले.दि.९ ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस लक्षातठेवण्यासाठी क्रांती दिवस म्हणूनसाजरा केला जातो.असे आपल्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ कदम यांनी सांगितले.गोवालिया टॅंक येथुन भाषण दिल्याने या मैदानाला ऐतिहासिक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.असे श्री.बापुसाहेब गायकवाड यांनीसांगितले. दि.९ ऑगस्ट या दिवशी इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारले म्हणून क्रांती दिन हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे असे श्री.भारत हांगे यांनी सांगितले.या दिवशी भारतातील ब्रिटिशराजवट संपवण्याची मागणी केली होती व हा दिवसजागतिक आदिवासी दिन म्हणूनही पाळला जातो असे आदर्श शिक्षिका श्रीमती गिताताई अंडील यांनी सांगितले.या वेळी बाळासाहेब राठोड, श्रीमती सोनाली भुमकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.भारतहांगे यांनी केले.श्रीमतीसोनाली भुमकर यांनी आभार मानले.या कार्यक्रमास शिक्षक,शिक्षिका,विद्यार्थी, शालेय पोषण आहारशक्ती निर्माणचे कामगार गणेश माने,शिक्षणप्रेमी राधा आक्का खामकर,शालेय व्यवस्थापन समितीसदस्य विकास माने,संपत्तीसरवदे हे उपस्थित होते.
Comments
Post a Comment