आंबेजोगाई येथील उप विभागीय कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांचे दोन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन चालू.
आंबेजोगाई येथील उप विभागीय कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांचे दोन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन चालू
केज/प्रतिनिधी
आंबेजोगाई येथील उप विभागीय कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांचे मागील दोन दिवसापासून विविध मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन चालू आहे.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचेराज्यव्यापी आंदोलन भाई मोहन गुंड यांच्यासह त्यांचे सहकारी हे विविध मागण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून आंबेजोगाई येथील उप विभागीय कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करत आहेत.शक्तिपीठ महामार्ग बाबतचे अधिसूचना रद्द करून मूळच्या २०१३ भूमिअधिग्रहण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी,बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ ७५ टक्के उर्वरित पीक विमा वाटप करण्यात यावा, राष्ट्रीय महामार्गावर दिशा दर्शक राजकीय जाहिरात बॅनर लावण्यावर बंदी घालून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,शेतकऱ्यां च्या मालाला हमीभाव देण्यात यावा यासहअनेक मागण्या घेऊन शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांच्यासहत्यांचे सहकारी हे गेले दोन दिवसापासून आंबेजोगाई येथील उपविभागीय कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करत आहेत.
Comments
Post a Comment