Posts

Showing posts from August, 2024

आंबेजोगाई येथील उप विभागीय कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांचे दोन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन चालू.

Image
  आंबेजोगाई येथील उप विभागीय कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांचे दोन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन चालू केज/प्रतिनिधी आंबेजोगाई येथील उप विभागीय कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांचे मागील दोन दिवसापासून  विविध मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन चालू आहे.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचेराज्यव्यापी आंदोलन भाई मोहन गुंड यांच्यासह त्यांचे सहकारी हे विविध मागण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून आंबेजोगाई येथील उप विभागीय कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करत आहेत.शक्तिपीठ महामार्ग बाबतचे अधिसूचना रद्द करून मूळच्या २०१३ भूमिअधिग्रहण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी,बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ ७५ टक्के उर्वरित पीक विमा वाटप करण्यात यावा, राष्ट्रीय महामार्गावर दिशा दर्शक राजकीय जाहिरात बॅनर लावण्यावर बंदी घालून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,शेतकऱ्यां च्या मालाला हमीभाव देण्यात यावा यासहअनेक मागण्या घेऊन शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांच्यासहत्यांचे सहकारी हे गेल...

तहसील कार्यालया समोर अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा उभे करण्या वरून रिक्षा चालकांची दादागिरी,भेळच्या गाड्यावर दगडफेक करत छोट्या व्यवसायिकास धक्काबुक्की करत रोड टॅक्स भरत असल्याची रिक्षा चालकांची धमकी

Image
  तहसील कार्यालया समोर अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा उभे करण्या वरून रिक्षा चालकांची दादागिरी,भेळच्या गाड्यावर दगडफेक करत छोट्या व्यवसायिकास धक्काबुक्की करत रोड टॅक्स भरत असल्याची रिक्षा चालकांची धमकी केज/प्रतिनिधी तहसील कार्यालया समोर अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा उभे करण्या वरून रिक्षा चालकाने दादागिरी केली आहे तसेच भेळच्या गाड्यावर दगडफेक करत छोट्या व्यावसायिकास धक्का बुक्की करत रोड टॅक्स भरत असल्याची रिक्षा चालकांनी धमकी दिली आहे.तसेच एका रिक्षा चालकाने त्याचा रिक्षा मेन रोडवर भर दिवसा आडवा उभा करून भेळचा व्यवसाय करणाऱ्यासोबत रिक्षा चालकांची भांडण झाल्याची घटना घडली आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की,तहसील कार्यालयाच्या समोरअवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा हे रस्त्यावर व कार्यालयाच्या समोर लावले जात आहेत सदर रिक्षामुळे तहसील कार्यालयात कामास येणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते तहसील कार्यालयासमोर सर्रासपणे रिक्षे उभे केल्या मुळे रस्त्याच्या बाजूने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच तहसील कार्यालया च्...

माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक माजी आमदारासह गाडीचा चालक जखमी

Image
  माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक माजी आमदारासह गाडीचा चालक जखमी केज/प्रतिनिधी केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. संगीताताई ठोंबरे या केज तालुक्यातील दहिफळ वड माऊली येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दहिफळ वडगाव येथ गेले असता अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून सायंकाळी ६:०० वाजता त्या ऋषी गदळे घरी चहापाण्यासाठी जात असताना विजय उत्तमराव गदळे यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात गाडीचा ड्रायव्हरच्या बाजूचा काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे याला लागला.  त्या नंतर तोच दगड गाडीमध्ये बसलेल्या माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांना लागून त्याही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार चालू आहे दरम्यान याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

Image
  बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न  * स्त्री सशक्तीकरणासाठी जनजागृती शिबिर अतिशय महत्वाचे-आरती जाधव * आत्मविश्वास आणि ठामपणा या बाजू मजबूत ठेवून महिलांनी अन्यायावर आवाज उठवावा- सीताताई बनसोड * कलंब  दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी बंसल क्लासेस कळंब शाखेच्या माध्यमातून महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण या विषयवार कळंब शाखेत शिबिर आयोजित करण्यात आले. या प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून पोलीस उप-निरीक्षक तथा पिंक पथकाच्या प्रमुख उपविभाग कळंब आरती जाधव मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून केज  नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड मॅडम या देखील उपस्थित राहिल्या. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजीवनी जाधवर मॅडम बी. डी.एस.आणि मोडेल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रा.लता यंदे मॅडम या देखील आवर्जून उपस्थित राहिल्या. स्त्री सशक्तीकरण व महिलांच्या सुरक्षेचा विषय लक्षात घेता बंसल क्लासेस कळंब व केज शाखेचे संचालक यासीन हारूणभाई इनामदार यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर का...

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांचा केज तालुक्यात झंझावात जिवाचीवाडी येथे स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नाम फलक कमानीचे उद्घाटन संपन्न

Image
  बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांचा केज तालुक्यात झंझावात जिवाचीवाडी येथे स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नाम फलक कमानीचे उद्घाटन संपन्न कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे  यांचा केज तालुक्यात झंझावात दौरा जागोजाजागोजागी  मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. परंतु सत्कारात फुलहार गुच्छ न घेता सर्वांच्या भेटी घेऊन जीवाचीवाडी,तूकूचीवाडी येथील जनतेशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी खुशखबर दिली की, मागील विज बिल भरायचे नाही येथून पुढे द्यायचे नाही,  शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच ५००० रुपये अनुदान जमा करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आश्वासित केले व यापुढेही आम्ही बहिण भाऊ दोघेही आपल्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव आपल्या सेवेत राहू आणि आपले असलेले ऋण आमच्या कातडीचे जोडे करून जरी तुम्हाला घातले तरी हे ऋण आम्ही फेडु शकत नाही असे यावेळी धनंजय मुंडे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.  तसेच परळी येथे पाच दिवसाचे कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे तरी आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सर्व शेतकरी बांधवांना...

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

Image
  ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई  केज, ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई करण्यात आली असून सदर कारवाईमध्ये १लाख ५० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करूनहॉटेल मालक व मॅनेजरयांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी एका गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की,केज-बीड या राष्ट्रीय महामार्गावरील मस्साजोग येथील अभिषेक बिअरबार येथे दि.१५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशाने ड्रायडे असताना देखील सदरचे बियरबार उघडे ठेवून दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने दुपारी ३-०० वाजण्याच्या सुमारासकेज पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊनशहानिशा केली असता त्या ठिकाणी दारू विक्री केली जात असल्याचे निष्पन्न झाल्या वरून सदर पथकाने छापा टाकून दोन पंचा समक्ष पंचनामा करून विदेशी दारूच्यारम,व्हिस्की,बियर,व्होडका इत्यादी असा अंदाजे एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.हॉटेल अभिषेकचे मॅनेजर अंकुश दयाराम पाटील रा.मस्साजोग आणि म...

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा

Image
स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा केज, आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी आदर्श ग्रामपंचायत कोल्हेवाडी गावामध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम ग्रामपंचायत कोल्हेवाडी येथील ध्वजारोहण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिसाळ वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डांगे वस्ती, तसेच शहीद जवान उमेश मिसाळ स्मारक इत्यादी, ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. आकाशात फडकणार्‍या ध्वजाकडे पाहत राष्ट्रगीत व देशभक्तीपर आणि समूहगीत मुलांनी सादर केली. उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीरांना पुष्पांजली अर्पण करून मार्गदर्शनपर भाषणात स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाच्या गोष्टी  मुलांना व ग्रामस्थांना सांगितल्या. कठीण प्रयत्नाने मिळालेले स्वातंत्र्य टिकविणे तुमच्याच हाती असल्याचे ते शेवटी विद्यार्थ्यांना म्हणाले. यानंतर एक प्रभात फेरी काढण्यात आली घरोघरी तिरंगा तुमच्या घरी आमच्या घरी सगळीकडे तिरंगा तिरंगा असे फलक हाती धरून स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत मुले व ग्रामस्थ चालत ...

नगराध्यक्षांचा कालावधी अडीचऐवजी 5 वर्षे; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Image
  नगराध्यक्षांचा कालावधी अडीचऐवजी 5 वर्षे; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय राज्यातील नगरपंचायत व नगरपालिकांमधील नगराध्यक्षांचा कालावधी आता 2.5 ऐवजी 5 वर्षे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 8 मोठे निर्णय घेण्यात आले असून मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेचा  आढावादेखील घेण्यात आला आहे. तसेच, राज्यातील नगरपंचायत व नगरपालिकांमधील नगराध्यक्षांचा कालावधी आता 2.5 ऐवजी 5 वर्षे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे, पुढील काही दिवसांता नगराध्यक्षपदासाठी (pressident) सोडत निघणार होती, त्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार नगराध्यक्षपदाची  स्वप्ने रंगवत होती, त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं आहे.  ( कचरा कुंड्या मिळण्याचे एकमेव ठिकाण वेदांत इंटरप्राईजेस केज.  मो. 97 67 26 6200 ) महाराष्ट्रात 228 नगरपरिषदा व नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवड...

Team India : दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिज कसोटी ड्रा होताच आयसीसीकडून WTC च्या रँकिंगची घोषणा, भारत कितव्या स्थानावर?

Image
  Team India : दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिज कसोटी ड्रा होताच आयसीसीकडून WTC च्या रँकिंगची घोषणा, भारत कितव्या स्थानावर? वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी ड्रॉ झाली आहे. त्रिनिदादमध्ये सुरु असलेल्या कसोटीत पावसानं देखील व्यत्यय आणला होता. ही कसोटी अनिर्णित झाल्यानंतर आयसीसीनं जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेचं रँकिंग जाहीर केलं आहे. आयसीसीनं या कसोटीनंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं रँकिंग जाहीर केलं आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्या गुणांमध्ये सुधारणा झालीय. मात्र, रँकिंगमध्ये बदल झाला नाही. भारतीय क्रिकेट संघ 9 मॅचपैकी 6 मॅच जिंकत 68.51 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. पोलसह एल.ई.डी पथदिवे संपर्क: वेदांत इंटरप्राईजेस केज मो.न. 97 67 26 62 00 भारतानंतर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया असून त्यांनी 12 पैकी 8 मॅच जिंकल्या असून त्यांचे गुण 62.5 इतके आहे. भारतानं यापूर्वी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, भारताला विजेतेपद मिळवण्यात अपयश आलं होतं. पहिल्या दोन स्थानांवर असलेले संघ अंतिम सामना खेळतील.

कापूस-सोयाबीन अर्थ सहाय्यासाठी प्रती हेक्टरी ५ हजारांचे अनुदान; ई-पीक पेरा नोंदणी असणारे सर्वच शेतकरी लाभार्थी- कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा..!

Image
  कापूस-सोयाबीन अर्थ सहाय्यासाठी प्रती हेक्टरी ५ हजारांचे अनुदान; ई-पीक पेरा नोंदणी असणारे सर्वच शेतकरी लाभार्थी- कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा..! दिनांक १२ ऑगस्ट,सन २०२३ मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे.पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा यासाठी त्यांचे वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक ना-हरकत पत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. २०२३ च्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनचे कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानी वर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने मागील वर्षीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये प्रमाणे, दोन हेक्टर पर्यंत मदत देण्याच्या निर्णय घेतला आहे. सदरील रक्कम सोयाबीन-कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी ई-पीक पेऱ्यांची नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते संलग्न असलेली माहिती, कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यां...

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत ऑगस्ट क्रांतीदिन साजरा

Image
 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत ऑगस्ट क्रांतीदिन साजरा                          केज/प्रतिनिधी  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी ता.केज या शाळेत दिनांक  ९ ऑगस्ट रोजी म.गांधी व क्रांतिकारकांच्या प्रतिमेस राजाभाऊ कदम व भारत हांगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दि.८ ऑगस्ट १९४२ रोजी कॉंग्रेसच्या मुंबई अधिवेशनात म.गांधींनी "भारत छोडो"आंदोलन सुरू केले.म.गांधीजींनी त्यांच्या भाषणात भारतीय जनतेला "करो या मरो"चे आवाहन केले.दि.९ ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस लक्षातठेवण्यासाठी क्रांती दिवस म्हणूनसाजरा केला जातो.असे आपल्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ कदम यांनी सांगितले.गोवालिया टॅंक येथुन भाषण दिल्याने या मैदानाला ऐतिहासिक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.असे श्री.बापुसाहेब गायकवाड यांनीसांगितले. दि.९ ऑगस्ट या दिवशी इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारले म्हणून क्रांती दिन हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे असे श्री.भारत हांगे यांनी सांगितले.या दिवशी भारतातील ब्रिटिशराजवट संपवण...