तहसील कार्यालया समोर अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा उभे करण्या वरून रिक्षा चालकांची दादागिरी,भेळच्या गाड्यावर दगडफेक करत छोट्या व्यवसायिकास धक्काबुक्की करत रोड टॅक्स भरत असल्याची रिक्षा चालकांची धमकी केज/प्रतिनिधी तहसील कार्यालया समोर अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा उभे करण्या वरून रिक्षा चालकाने दादागिरी केली आहे तसेच भेळच्या गाड्यावर दगडफेक करत छोट्या व्यावसायिकास धक्का बुक्की करत रोड टॅक्स भरत असल्याची रिक्षा चालकांनी धमकी दिली आहे.तसेच एका रिक्षा चालकाने त्याचा रिक्षा मेन रोडवर भर दिवसा आडवा उभा करून भेळचा व्यवसाय करणाऱ्यासोबत रिक्षा चालकांची भांडण झाल्याची घटना घडली आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की,तहसील कार्यालयाच्या समोरअवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा हे रस्त्यावर व कार्यालयाच्या समोर लावले जात आहेत सदर रिक्षामुळे तहसील कार्यालयात कामास येणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते तहसील कार्यालयासमोर सर्रासपणे रिक्षे उभे केल्या मुळे रस्त्याच्या बाजूने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच तहसील कार्यालया च्...
आंबेजोगाई येथील उप विभागीय कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांचे दोन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन चालू केज/प्रतिनिधी आंबेजोगाई येथील उप विभागीय कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांचे मागील दोन दिवसापासून विविध मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन चालू आहे.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचेराज्यव्यापी आंदोलन भाई मोहन गुंड यांच्यासह त्यांचे सहकारी हे विविध मागण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून आंबेजोगाई येथील उप विभागीय कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करत आहेत.शक्तिपीठ महामार्ग बाबतचे अधिसूचना रद्द करून मूळच्या २०१३ भूमिअधिग्रहण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी,बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ ७५ टक्के उर्वरित पीक विमा वाटप करण्यात यावा, राष्ट्रीय महामार्गावर दिशा दर्शक राजकीय जाहिरात बॅनर लावण्यावर बंदी घालून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,शेतकऱ्यां च्या मालाला हमीभाव देण्यात यावा यासहअनेक मागण्या घेऊन शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांच्यासहत्यांचे सहकारी हे गेल...
माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक माजी आमदारासह गाडीचा चालक जखमी केज/प्रतिनिधी केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. संगीताताई ठोंबरे या केज तालुक्यातील दहिफळ वड माऊली येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दहिफळ वडगाव येथ गेले असता अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून सायंकाळी ६:०० वाजता त्या ऋषी गदळे घरी चहापाण्यासाठी जात असताना विजय उत्तमराव गदळे यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात गाडीचा ड्रायव्हरच्या बाजूचा काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे याला लागला. त्या नंतर तोच दगड गाडीमध्ये बसलेल्या माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांना लागून त्याही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार चालू आहे दरम्यान याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Comments
Post a Comment