बीड जिल्ह्याची लेक अनुक्रमांक 1
बीड जिल्ह्याची लेक अनुक्रमांक 1
बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ छत्रपती उदयनराजे भोसले ,अजित दादा पवार , देवेंद्र फडणवीस, महादेव जानकर,धनंजय जी मुंडे यांनी ताईंना निवडून देण्याचे आवाहन बीड जिल्हावाशीयांना केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बहिणीच्या म्हणजेच पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ जिल्ह्यात आले असता त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी पंकजा ताईंना निवडून द्या अशी भावनिक साद जनतेला घातली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याच्या व बीड जिल्ह्याच्या विकासासाठी पंकजाताईंना संसदेत पाठवा त्यांच्या मंत्रिपदासाठी मी स्वतः मोदीजींकडे शिफारस करणार आहे.
रासपचे नेते महादेव जानकर यांनी पंकजाताईंना कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्य देऊन विजय करण्याचे आवाहन केले.
भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजलगाव येथे झालेल्या सभेत पंकजाताई च्या एका पत्रावर बीड जिल्ह्यातील रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी दिल्याचा उल्लेख केला व पंकजाताईंना निवडून देण्याचे आवाहन केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील सभेत पंकजाताई चा उल्लेख भावी केंद्रीय मंत्री असा केला जिल्ह्यातील जनतेने आजपर्यंत जात-पाच धर्म पाहून नव्हे तर नेतृत्व कर्तृत्व पाहून मतदान केले आहे पंकजाताई पालकमंत्री असताना केलेला विकास पाहून मतदान करा अशी आवाहन केले.
बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मतदान रुपी आशीर्वाद देऊन आपले नेतृत्व करण्याची संधी द्यावी यापूर्वी राज्य मंत्रिमंडळात असताना बीड जिल्ह्यातील विकासासाठी भरघोस असा निधी आणून विकास केला तुमच्या सेवेसाठी शेवटची संधी द्या जीवाचे रान करून विकास रूपाने परतफेड करेल असा विश्वास पंकजाताईंनी दिला.
Comments
Post a Comment