महाराष्ट्र लोकविकास मंच कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
महाराष्ट्र लोकविकास मंच कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र (खरीप हंगामात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते वाटपाची केली मागणी.) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात मागील वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामामध्ये पावसाने पार दांडी मारल्याने महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करून दुष्काळी परिस्थितीत उपाययोजना जाहीर केल्या आहेत. खरीप व रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना उत्पन्न घेता आले नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे, शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे लागवडीसाठी व खते मोफत उपलब्ध करून द्यावे. सक्रिय महाराष्ट्राचे पालक म्हणून कार्य करावे. शेतकऱ्यांची होणारी हाल अपेष्टया पहावत नाही. जे गावात मजूर आहेत. त्यांना गावात रोजगार मिळत नाही. मजुराची हाल होत आहेत. निवळ मजूर वर मजुरी वरती असणारी मजुरांची पोट आता उपाशी मरायला लागली आहेत. साखर कारखान्यावरून आलेले मजूर यांना सध्या दोन हाताला काम मिळने अत्यंत गरजेचे आहे, उपासमारीची वेळ आता लोकांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे ताबडतोब रोजगार हमीची कामे गावागावात सुरू करावीत अशी विनंती आहे, खरीप हंगाम जून 2024 ला जेव्हा पेरण्या ...