पोस्ट्स

जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या हस्ते मांजरा धरणाचे जलपूजन संपन्न ; मांजरा धरण भरल्याचा आनंद आहे,अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेणार- रमेशराव आडसकर

इमेज
जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या हस्ते मांजरा धरणाचे जलपूजन संपन्न ; मांजरा धरण भरल्याचा आनंद आहे,अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेणार- रमेशराव आडसकर केज धनेगाव येथील केज सह अंबाजोगाई,लातूर येथील जलवाहिनी समजले जाणारे मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे.हा एक सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बाब असून  शेतकरी बांधवावर निसर्गाची कृपा कायम रहावी असे उद्गार रमेशराव आडसकर यांनी धनेगाव येथील मांजरा धरणाच्या जलपूजन करते वेळी व्यक्त केले.मागील काही दिवसांत भरपूर पाऊस झाल्याने अनेक शेतकर्यांचे पिक गेले आहेत.त्यांचे पंचनामे करणे सुरू आहे. मी स्वतः उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भेटून पिडीत शेतकर्यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे.असेही रमेशराव आडसकर यांनी उपस्थित शेतकरी यांना आश्वासन दिले.  तसेच मांजरा धरण भरले आहे. व पाऊस काळ चांगला झाला आहे.त्यामुळे उसाचे पिक चांगले रहाणार आहे.अंबा सहकारी साखर कारखाना परिसरातील सर्व उस नेण्यासाठी तत्पर असून चांगला भाव देण्याची हमी देखील रमेशराव आडसकर यांनी दिली आहे.त्या...

केज तालुक्यात आरोग्य विभागाचा अजबच प्रकार,कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांना करु लागले बळजबरी

इमेज
केज तालुक्यात आरोग्य विभागाचा अजबच प्रकार,कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांना करु लागले बळजबरी. केज प्राथमिक आरोग्य केंद्र विडा परिसरातील गावागावांत आशा स्वयंसेविका घराघरात जाऊन कुटुंबातील महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी सक्ती करु लागल्या आहेत.आशा स्वयंसेविका कुटुंबातील महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिये साठी प्रवृत्त करण्या बरोबरच बळजबरी पण करु लागल्या आहेत. महिलांचे फोटो काढणे सह्या घेणे प्रकार सुरू केला आहे.त्यामुळे विडा परिसरात महिला दडपणाखाली आल्या आहेत.आशा स्वयंसेविकांना गावातील महिला सही देत नाहीत म्हटले तर त्या म्हणतात तुमच्या सर्व योजना सरकार बंद करणार आहे.हा अजब च प्रकार पाहून महिला घाबरून गेल्या आहेत. या प्रकरणी काय गोड बंगाल आहे हे आरोग्य विभागाने तातडीने स्पष्ट केले पाहिजे असे या भागातील लोक म्हणत आहेत.आज लहुरी आणि परिसरातील गावागावांतून लोक म्हणत आहेत की हा प्रकार तातडीने थांबला पाहिजे सध्या सगळी कडे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या या प्रकरणी लोक दडपणा खाली आले आहेत. तरी तालुका वैद्यकीय अधिकारी केज आणि विडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी य...

विजेचा धक्का लागून शेतकरी ठार

इमेज
  विजेचा धक्का लागून शेतकरी ठार.  केज केज तालुक्यातील कोरडेवाडी शिवारातील घाटेवस्ती येथे राहणारे शेतकरी बाबासाहेब रावसाहेब राख,वय 55 वर्षे यांना सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान विजेचा धक्का बसला.जखमी अवस्थेत त्यांना केज येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेवून गेले असता डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन त्यांना मयत घोषित केले. सोमवारी दि.18 आॕगष्ट रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान कोरडेवाडी शिवारातील घाटेवस्ती येथे राहणाऱ्या बाबासाहेब रावसाहेब राख,वय 55 वर्षे यांना सोमवारी दि.18 आॕगष्ट रोजी राहत्या घरी विजेचा धक्का लागून ते जखमी झालेहोते.त्यांना पुढील उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात घेवून गेल्या नंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करुन त्यांना मयत झाल्याचे घोषित केले.बाबासाहेब राख यांच्या पश्च्यात पत्नी, 1 मुलगा असा परिवार असून सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर कोरडेवाडी येथील स्म्शानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले.

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने प्रफुल्ल कुलकर्णी यांना धर्मवीर जिवन गौरव पुरस्कार प्रदान.

इमेज
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने प्रफुल्ल कुलकर्णी यांना धर्मवीर जिवन गौरव पुरस्कार प्रदान.   अंबाजोगाई  विश्व हिंदू परिषद अंबाजोगाई प्रखंड च्या वतिने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोरजी मुंदडा, डॉ.शरदराव हेबाळकर, साईनाथ उपरे, डॉ.गोपाळ चौसाळकर,प्रणव रायचुरकर, गणेश पांचाळ, चंद्रकांत घोलप, कृष्णा देशमुख उपस्थित होते.  विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रास्ताविक डॉ चौसाळकर, चंद्रकांतजी घोलप म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या माध्यमातून हिंदू समाज संघटनाचे कार्य सुरू आहे.हिन्दु समाजासमोर अनेक समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कृष्णा देशमुख म्हणाले की, प्रफुल्ल कुलकर्णी यांनी राष्ट्र कार्यासाठी जिवन झोकून दिले.देशापुढील समस्या सोडविण्यासाठी हिंदू तरुणांनी संघटीत होऊन कार्य केले पाहिजे.समाज देश व संस्कृती टिकली पाहिजे असे आवाहन केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना नंदकिशोर मुंदडा म्हणाले की,समाज कार्यासाठी वेळ देणे...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, शाखा केजच्या वतीने पत्रकार चंद्रकांत पाटील यांचा 54 वा वाढदिवस साजरा.

इमेज
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, शाखा केजच्या वतीने पत्रकार चंद्रकांत पाटील यांचा 54 वा वाढदिवस साजरा. केज  आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, एक नदीसारखा जो सतत वाहत असतो. प्रत्येक दिवस नवा अनुभव घेऊन येतो, पण वाढदिवस हा एक विशेष दिवस असतो. हा दिवस आनंद, खुशी आणि नवीन आशा घेऊन येतो. वाढदिवस म्हणजे आपल्या प्रियजनांसोबत एकत्र येऊन त्यांचा खास दिवस साजरा करण्याचा, आनंद आणि उत्सव अनुभवण्याचा वेळ आहे. हा दिवस जीवनातील यश, स्वप्ने आणि प्रेम साजरे करण्याची एक खास संधी देतो. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, शाखा केजच्या वतीने संघातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार तथा महाराष्ट्राचे पत्रकार संघ मुंबई शाखा केजचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा 54 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.  यामध्ये केज नगरपंचायत च्या नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड, बाजीराव ढाकणे ( जिल्हा समन्वयक गो- शाळा जलदुत, पर्यावरण प्रेमी तथा जिल्हा समन्वयक महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य,भारतीय नमो संघाचे प्रदेश अध्यक्ष भाऊसाहे...

जीवन शिक्षण शैक्षणिक संकुलात 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

इमेज
जीवन शिक्षण शैक्षणिक संकुलात 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. केज  केज येथील झुंजार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जीवन शिक्षण शैक्षणिक संकुलाच्या  वतीने 79 वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती फैमून्निसा बेगम इनामदार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री हरून भाई इनामदार हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थिताना शुभेच्छा दिल्या. केज च्या नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, मार्गदर्शक श्री नबी भाई इनामदार,संस्थेचे सहसचिव श्री मोहम्मद यासीन हरून इनामदार, नगरसेवक राजू भाई इनामदार, जलाल भाई इनामदार, पद्मिन अक्का शिंदे,डॉ. त्र्यंबक चाटे, मुख्याध्यापक रमाकांत ढाकणे, प्रा.दत्ता हंडीबाग,विनायक ठोंबरे, सहाय्यक मुख्याध्यापक श्री संदीप गुळवे,रामचंद्र जाधव, श्री मुफसिल शेख, श्री पठाण व इतर मान्यवर तसेच पालक उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दिनांक 13,14, व 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांनी घुंगरू काठी, लेझिम, डंबेल,टिपरी इ...

माजलगाव धरण ४२ टक्के भरले.

इमेज
माजलगाव धरण ४२ टक्के भरले. माजलगाव  बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे नद्या, नाले ओसंडून वाहू लागले असून प्रकल्पातील पाणीसाठ्यातही वाढ होऊ लागली आहे. माजलगाव धरण ४२ टक्के भरले आहे. तालुक्यात गेल्या २४ तासात २२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यात गेल्या २४ तासामध्ये १२.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुनपासून ते आत्तापर्यंत ५८.५ टक्के पाऊस झाला आहे.